मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल अमीर कसाब याला आज (बुधवार) पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. यासंदर्भातला घटनाक्रम..
* २६ नोव्हेंबर २००८ – कसाबसह दहा दहशतवाद्यांचा मुंबईवर हल्ला
* २७ नोव्हेंबर २००८ – मध्यरात्री दीड वाजता कसाब पोलिसांच्या हाती लागला. अटकेनंतर नायर हॉस्पिटलमध्ये त्याची रवानगी
* २९ नोव्हेंबर २००८ – दहशतवाद्यांच्या तावडीतील सर्व ओलिसांची सुखरूप सुटका. नऊ दहशतवादी ठार
* ३० नोव्हेंबर २००८ – कसाबचा पोलिसांसमोर कबुलीजबाब
*२७-२८ डिसेंबर २००८ – ओळखपरेड
* १३ जानेवारी २००९ – २६/११च्या खटल्यासाठी एम. एल. ताहिलियानी यांची नियुक्ती
* १६ जानेवारी २००९ – कसाबचा खटला आर्थर रोड तुरुंगात चालवण्याचा निर्णय
* ५ फेब्रुवारी २००९ – कुबेर जहाजात सापडलेल्या वस्तूंवरील ठसे आणि कसाबचे डीएनए नमुने यांची जुळणी
* २०-२१ फेब्रुवारी २००९ – महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे कसाबचा कबुलीजबाब
* २२ फेब्रुवारी २००९ – उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
* २५ फेब्रुवारी २००९ – कसाबवर आरोपपत्र दाखल, आणखी दोघांवरही आरोपपत्र
* १ एप्रिल २००९ – अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती
* १५ एप्रिल २००९ – अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबचे वकीलपत्र काढून घेतले
* १६ एप्रिल २००९ – अब्बास काझमी कसाबचे नवे वकील
* १७ एप्रिल २००९ – न्यायालयात कसाबचा कबुलीजबाब खुला. मात्र, त्याने तो नाकारला
* २० एप्रिल २००९ – सरकारी वकिलांचे कसाबवर एकूण ३१२ आरोप
* २९ एप्रिल २००९ – कसाब हा अल्पवयीन नसल्याचा तज्ज्ञांचा दावा
* ६ मे २००९ – आरोप निश्चित, कसाबवर एकंदर ८६ आरोपांची निश्चिती. मात्र, त्याचा इन्कार
* ८ मे २००९ – प्रथम साक्षीदाराची साक्ष, कसाबला ओळखले
* २३ जून २००९ – हाफीज सईद, झकीउर रहमान लखवी यांच्यासह २२ जणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
* ३० नोव्हेंबर २००९ – अब्बास काझमी यांच्याकडून कसाबचे वकीलपत्र काढून घेतले
* १ डिसेंबर २००९ – काझमींच्या जागी के. पी. पवार यांची नियुक्ती
* १६ डिसेंबर २००९ – सरकारी वकिलांकडून २६/११ खटल्याचे कामकाज पूर्ण
* १८ डिसेंबर २००९ – कसाबकडून सर्व आरोपांचा इन्कार
* ३१ मार्च २०१० – खटल्यातील वाद-प्रतिवाद पूर्ण. ताहिलियानींनी ३ मेपर्यंत निर्णय राखून ठेवला
* ३ मे २०१० – कसाब दोषी. सबाउद्दिन अहमद आणि फहीम अन्सारी यांची दोषारोपातून मुक्तता
* ६ मे २०१० – कनिष्ठ न्यायालयात कसाबला फाशीची शिक्षा
* २१ फेब्रुवारी २०११ – मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला
* मार्च २०११ – उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कसाबचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान
* १० ऑक्टोबर २०११ – सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या शिक्षेची अंमलबजावणी रोखली. देवाच्या नावाखाली क्रूर कृत्य करण्यासाठी आपले रोबोसारखे ब्रेनवॉशिंग केले गेल्याचा दावा करत अल्पवयीन असल्याने फाशीची शिक्षा योग्य ठरत नसल्याचा कसाबचा दावा.
* १८ ऑक्टोबर २०११ – सबाउद्दिन अहमद आणि फहीम अन्सारी यांची सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली
* ३१ जानेवारी २०१२ – आपल्यावरील खटल्याची योग्य सुनावणी झाली नसल्याचा कसाबचा दावा
* २३ फेब्रुवारी २०१२ – कसाब व त्याच्या सहकाऱ्यांना पाकिस्तानातील नियंत्रण कक्षातून सूचना देणाऱ्या दहशतवाद्यांमधील संवाद सर्वोच्च न्यायालयात सादर. सीसीटीव्हीचे फुटेजही सादर.
* २५ एप्रिल २०१२ – सर्वोच्च न्यायालयाने अडीच महिने निर्णय राखून ठेवला
* २९ ऑगस्ट २०१२ – कसाबच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब. सहआरोपींच्या मुक्ततेवर सर्वोच्च न्यायालयही ठाम.
* १६ ऑक्टोबर : कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची राष्ट्रपतींना शिफारस.
* ५ नोव्हेंबर : राष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला.
* ८ नोव्हेंबर : राज्य सरकारला राष्ट्रपतींचा निर्णय कळविण्यात आला.
*  २१ नोव्हेंबर २०१२ – दहशतवादी अजमल अमीर कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajmal chronology
First published on: 21-11-2012 at 11:56 IST