Devendra Fadnavis On Supriya Sule : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने १३० हून अधिक जागा मिळवल्या आणि देवेंद्र फडणवीस पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. आज मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल नागपूरात फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रिया सुळे यांनी तीन वर्षांपूर्वी “अकेला देवेंद्र क्या करेगा?” म्हणत केलेल्या टीकेला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुप्रिया ताईंचे म्हणणे खरे होते…

या सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय मिळाला. आज सत्कार जरी मंचावरील लोकांचा होत असला तरी तो तुमच्या सर्वांच्या वतीने स्वीकारत आहोत. भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही स्वीकारतोय. कारण कार्यकर्त्यांचे प्रतिक म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. एकदा सुप्रिया ताई असे म्हणाल्या होत्या की, अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रिया ताईंचे म्हणणे खरे होते. अकेले देवेंद्र की कोई औकात नही है, अकेला देवेंद्र कुछ नही कर सकता. पण त्यांना त्यावेळी माहित नव्हते देवेंद्र एकटा नाही त्याच्याबरोबर संपूर्ण भारतीय जनता पार्टी आहे.”

Devendra Fadnavis on Beed Politics
देवेंद्र फडणवीसांचे ‘नवीन बीड’चे आवाहन धनंजय मुंडेंसाठी आणखी एक धक्का आहे का?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
devendra fadnavis pimpri chinchwad news in marathi
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस गुरुवारी पहिल्यांदाच बालेकिल्ल्यात
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : दावोसमध्ये भारतीय कंपन्यांशीच करार; फडणवीसांनी स्पष्टच सांगितली यामागची कारणमीमांसा
Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, “अकेला देवेंद्र क्या करेगा?” आज तीन वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला उत्तर दिले आहे.

हे ही वाचा : “उदय सामंत हुशार, त्यांना जगभराची माहिती”; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी मंत्र्यांमध्ये जुंपली

फडणवीस पाच वर्षांनी पुन्हा मुख्यमंत्री

२०१९ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला बहुमत मिळाले होते. पण, मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने शिवसेना बाहेर पडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यानंतर सुमारे दोन वर्षांत एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंड केले आणि भाजपा पुन्हा सत्तेत आली. दरम्यान त्यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली होती. पुढे, अजित पवारही सुमारे ४० आमदारांबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपाने १३२ जागा आणि महायुतीने २३७ जागा मिळवत सत्ता कायम राखली. यावेळी सर्वाधिक जागा असल्याने भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली.

Story img Loader