मांडवा सागरी पोलीस ठाण्याला भारतीय तटरक्षक दलाकडून दिला जाणारा बेस्ट अशोर युनिट २०१९-२० पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.  मार्च २०२० मध्ये मांडवा जवळ समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत आठ प्रवाशांचे जीव वाचवल्याबद्दल हा मांडवा पोलीस ठाण्याला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

    दिल्ली येथे २५ नोव्हेंबर येथे विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख डॉ. के नटराजन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘बेस्ट अशोर युनिट २०१९-२०’ सन्मान प्रदान करण्यात आला.

   मार्च 2020 रोजी मांडवा जेट्टी येथील अल् फतेह प्रवाशी बोट बुडत होती. यावेळी मांडवा पोलीस ठाणेचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखून जवळ असलेल्या सदगुरू कृपा या बोटीच्या मदतीने ८ प्रवाशांची सुखरूप सुटका केली होती.  या मदत व बचाव कार्याची दखल घेऊन पोलीस ठाण्याला सन्मानित करण्यात आले आहे.