अलिबाग – अलिबाग तालुक्यातील वरसोली इथं सुरू असलेल्या कुंटणखान्याचा अलिबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येथील लोटस लाॅजींग येथे वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अलिबाग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वेश्या व्यवसायासाठी असलेल्या पीडीतेला ताब्यात घेत महिला सुधारगृहात पाठविण्यात आले.

वरसोली येथील लोटस लाॅजींगवर अवैधरीत्या देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहीती अलिबाग गोपनिय सुत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करीत ही संध्याकाळी कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक किशोर साळे, पोलिस उपनिरीक्षक दिपक मोरे, महिला पोलिस उपनिरीक्षक सत्यभामा खरात, पोलीस हवालदार जयेंद्र पाटील, परेश म्हात्रे, महिला पोलिस हवालदार मयुरी जाधव, पो.शिपाई शुभम नांदगावकर, अनिकेत पाटील, अनिकेत ढिवरे, सुनिल जाधव यांचे पथके तयार करण्यात आले. या कारवाईसाठी दोन महिलांना पंच म्हणुन पाचारण करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक बनावट ग्राहक पाठवून देहविक्रीचा व्यवसाय चालु असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीसांना सांकेतीक इशारा दिला. त्यानंतर तात्काळ पोलिस पथकाने धाड मारून तेथे वेश्या व्यवसायासाठी आलेल्या पीडीत मुलीला मुक्त केले. यामध्ये राजेश रामलखन चौपाल व जोत्स्ना दास यांच्या विरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.