मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसह कोल्हापुरात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या कुख्यात गुंड अमोल भास्कर यांचे फलक दुसऱ्यांदा उतरवण्यात आले. काहींनी हा प्रश्न राजकीय प्रतिष्ठेचा करून फलक पुन्हा उभारले होते. पण माध्यमांच्या दबावामुळे आणि समाज माध्यमातून उठणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांमुळे फलक उतरणे भाग पडले. यावरून कोल्हापुरात रात्रीस खेळ चाले असा प्रकार रंगला होता.

हेही वाचा- प्रताप सरनाईकांकडून तब्बल ७५ तोळं सोनं तुळजाभवानीला अर्पण

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?

महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व बाळासाहेबांचे ठाकरे सेनेचे स्थानिक नेते राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात काही फलक लावले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व क्षीरसागर यांच्या प्रतिमेसमवेत संघटित गुन्हेगारी कायदा (मोका ) अंतर्गत कारवाई झालेला अट्टल गुंड अमोल भास्कर यांनीही फलक उभारले होते. थेट मुख्यमंत्रीच गुंडांसमवेत चमकू लागल्याने त्यावरून समाज माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

हेही वाचा- एकही गाव राज्याबाहेर जाऊ देणार नाही!; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा अमान्य

त्यावर भास्कर अमोल भास्कर यांच्यावरील मोका कारवाई दोन महिन्यापूर्वी रद्द झाली आहे. हा मुद्दा पुढे करून त्याचे फलक काहीनी राजकीय प्रतिष्ठा करून पुन्हा उभारण्यास भाग पाडल्याची चर्चा रंगली होती. परंतु त्यानंतरही नागरिकांनी आपला संताप नोंदवणे कायम सुरूच ठेवले. तर दुसरीकडे माध्यमातून याची जोरदार चर्चा होत राहिली. यामुळे रातोरात पुन्हा अमोल भास्कर याचे फलक काढून टाकण्यात आले. या जागी अन्य फलक उभारले गेले आहेत.