विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला ठाकरे गटातील आमदारांची बाजू ऐकून घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलं आहे. अशात बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. आमदार अपात्रतेची निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाबाबत मजबुतीने आणि चलाखीने कामगिरी बजावली. त्यामुळे अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल,” असं विधान बच्चू कडू यांनी केलं.

हेही वाचा : “भाजपाने नाहीतर शिवसेनेनं युती तोडली”, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “एकीकडे…”

यावर ‘टीव्ही ९ मराठी’ला अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत. काहीतरी कुरापती काढून विलंब लावला जात आहे. बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून कळतं की, निर्णय काय द्यायचा हे आधीच ठरलं होतं की काय? पण, आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आहे. म्हणून अध्यक्षांनी दिलेला निकाल अखेरचा असेल, अशी शक्यता नाही,” असं दानवेंनी म्हटलं.

हेही वाचा : “लोकसभेत नारायण राणे वैचारिक उंचीप्रमाणे बोलले, त्यामुळे…”, अरविंद सावंत यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोज एक असे ५३ आमदारांची बाजू राहुल नार्वेकर ऐकणार आहेत, यावर विचारल्यावर अंबादास दानवे म्हणाले, “हा वेळकाढूपणा असल्याचं मी बोललो आहे. सगळ्या आमदारांची बाजू एकत्रच ऐकली पाहिजे. ४० गद्दार आणि आमचे आमदार काय वेगळी भूमिका मांडणार आहेत?”