माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. ट्विटरवरून त्या नेहमीच सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसतात. नुकतीच अमृता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पण यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी नेटकऱ्यांना रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायला सांगितला आहे. याशिवाय त्यांना एक ऑफर देखील दिली आहे.

आणखी वाचा : “मी अनुष्कासोबत पुन्हा सेक्स सीन…”, रणवीर सिंगने केलेलं खळबळजनक वक्तव्य

अमृता यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वत:चा एक विचार करत बसलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिले “रिक्त स्थान भरें; आज मैं _
१. Corona positive पाई गई हूँ ..
२. एक दुख भरा प्रेम गीत लिख रही हूँ ..
३. बरसात से पहले, #mumbai की सड़कों का मुआइना करने का Plan बना रही हूँ .. सहीं जवाब चुनने वालो को मिलेगा like ” त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावर अनेक नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा : IMDb नुसार हे आहेत भारतातील टॉप ८ कॉमेडी चित्रपट, तुम्ही यापैकी कोणते पाहिलेत?

आणखी वाचा : सलमानकडे कपडे घ्यायला नव्हते पैसे, तेव्हा सुनील शेट्टीने केली होती ‘अशी’ मदत

अमृता यांनी सोशल मीडियावर मंडे मोटिव्हेशन म्हणतं ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी “आज मी_”, असं म्हणत लोकांना पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. पहिला पर्याय मी कोरोना पॉजिटिव्ह आहे. दुसरा पर्याय मी एक दु:खी प्रेमगीत लिहित आहे. अमृता यांनी ही मंडे ऑफर देताना महाविकास आघाडीवर टीकेची संधी सोडलेली नाही. तिसरा पर्याय, पावसाळ्याच्या आधी मुंबईच्या रस्त्यांचा आढावा घेत आहे, असे पर्याय त्यांनी दिले आहेत.

आणखी वाचा : मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या Arangetram सोहळ्यात, सलमान- आमिरसोबत ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृता यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना वाटत असलेले पर्याय सांगितले आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘बरसात से पहले, #mumbai की सड़कों का, मुआइना करने का Plan बना रही हूँ..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तीन नंबरचे chances जास्त दिसत आहेत… एक आणि दोन तर कमेंन्टमध्ये लिहू पण वाटत नाहीत.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मॅम, कृपया दुसरा पर्याय नका निवडू’