नांदेडमधील सहायक लेखाधिकारी (रोहयो) सतीश पंजाबराव देशमुख यांनी अखेर, जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात घोडा बांधण्याची आपली मागणी मागे घेत, माफीनामा सादर केला आहे.  घोडा खरेदीची व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारे एक पत्र सतीश देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते. त्यात पाठीच्या दुखण्यामुळे वेळेत कार्यालयात येण्यासाठी घोडा खरेदीची व त्याला बांधण्याची परवानगी मागितली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर हे पत्र समाज माध्यमावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. अशा प्रकारची विनंती करणाऱ्या पत्राबाबतच्या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी देखील दुजोरा दिला. तर, सतीश देशमुख यांच्या मागणीवर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागवला गेला. अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय दिला. तो अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला.यानंतर या सतीश देशमुख यांनी त्यांची मागणी मागे घेत माफीनामा सादर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

नांदेड: “…म्हणून मी घोड्यावरून ऑफिसला येणार, जिल्हाधिकारी कार्यालयात घोडा बांधण्याची परवानगी द्या”

दरम्यान, आपण ऑफिसला येताना घोड्यावर येण्याचा विचार करत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मला घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सहाय्यक लेखाधिकारी असणाऱ्या सतीश देशमुख यांनी केली होती.

३ मार्च रोजी हे पत्र लिहिण्यात आलं आहे. “कार्यलयीन परीसरामध्ये घोडा बांधण्याची परवानगी मिळण्याबद्दल’, असा या पत्राचा विषय आहे. ‘उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की मी सतीश पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होतो. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. घोड्यावर बसून विहीत वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात परवानगी देण्यात यावी, ही विनंती ” असा मजकूर या पत्रामध्ये आहे. तसेच या पत्राची एक प्रत रोहयोच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्याचेही पत्रामध्ये नमूद केलेलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An apology from the accounts officer seeking permission to stand a horse in the collectorate premises msr
First published on: 03-03-2021 at 20:37 IST