येथील ओंकार सांस्कृतिक कलामंचचा कलाकार अनिकेत आसोलकर यांची झी मराठीवर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या कार्यक्रमात प्रथम फेरीत निवड झाली आहे. तर अन्य कलाकार पहिल्या फेरीत आपले नशीब आजमावत आहेत. कोल्हापूर येथे आज पार पडलेल्या ऑडीशनसाठी सावंतवाडीतील पाच कलाकार सहभागी झाले होते. यात ओंकार सांस्कृतिक कलामंचचे अनिकेत आसोलकर, नारायण पेडुरकर, संतोष पवार यांच्यासह राहुल शिरोडकर व महेश जांभोरे यांचा समावेश आहे. यातील पेडुरकर व जांभोरे हे दोघे जण पहिल्या फेरीत यशस्वी झाले आहेत. तर अनिकेत आसोलकर याने दुसरी फेरी यशस्वीपणे पार करीत थेट मुंबई येथे होणाऱ्या तिसऱ्या फेरीत स्थान पटकावले आहे.
हा कार्यक्रम झी मराठी या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. याचे ऑडिशन आज कोल्हापूर येथे पार पडली. यात त्यांची निवड करण्यात आली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या अनिकेत याची निवड झाल्याने सावंतवाडीत त्याच्या मित्रपरिवाराच्या जल्लोष करण्यात आला आहे. त्याच्या या यशाबद्दल ओंकार सांस्कृतिक कलामंचच्या वतीने अध्यक्ष अमोल टेंबकर व कार्याध्यक्ष निरंजन सावंत यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2012 रोजी प्रकाशित
‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये सावंतवाडीचा अनिकेत आसोलकर
येथील ओंकार सांस्कृतिक कलामंचचा कलाकार अनिकेत आसोलकर यांची झी मराठीवर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या कार्यक्रमात प्रथम फेरीत निवड झाली आहे. तर अन्य कलाकार पहिल्या फेरीत आपले नशीब आजमावत आहेत.
First published on: 26-11-2012 at 01:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aniket asolkar select in dance maharastra dance