scorecardresearch

“…तर त्यांना नोकरीची गरज नाही असं समजू”; अनिल परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

राज्यात सध्या ५ हजार बसेस सुरू झाल्या आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

st and anil parab
एसटी आणि अनिल परब (फाईल फोटो)

एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याासाठी जी मुभा दिली होती ती आज ३१ मार्चपर्यंतची होती. आज ती मुदत संपतीये, आज दिवसाअखेर किती कर्मचारी कामावर हजर झाले, याची आकडेवारी माझ्याकडे येईल. जे कर्माचारी हजर झाले त्यांच्यावर कारवाई होणार नाही. तसेच बडतर्फ आणि सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलंय. उद्यापासून कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू करू, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.


“आतापर्यंत सात वेळा मी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आणि त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचं आवाहन केलं. परंतु प्रशासन फक्त सांगतंय आणि करत काहीच नाही, असा एक समज झालाय. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरू करतोय. याशिवाय आम्ही ११ हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची नेमणूक करण्याचं आमचं टेंडर तयार आहे, त्यासंदर्भात आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ,” असं अनिल परब यांनी सांगितलं.


तसेच “जे कर्मचारी उद्यापासून कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असं आम्ही समजू. वारंवार आवाहन करूनही ते कामावर हजर राहत नाहीत. कोर्टाने त्यांच्यावर कारवाई न करण्याबद्दल कोणतेही आदेश दिलेले नाही. कोर्टाने दिलेल्या निर्णयासंदर्भात आम्ही कॅबिनेटची मंजुरी घेतली आहे. ती मंजुरी घेतल्यानंतर आता आम्ही अॅफिडेविट कोर्टात सादर केली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.


“नियमानुसार जी कारवाई करायची असेल ती कारवाई करू. मग ते निलंबन असो वा बडतर्फ करणं,” असं अनिल परब म्हणाले. ११ हजार कंत्रांटी कर्मचारी आम्ही घेणार आहोत. जे या निकषात बसतील, त्यांना कामावर घेतलं जाईल. सध्या ५ हजार बसेस सुरू झाल्या आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anil parab asks st employees to join duty hrc

ताज्या बातम्या