Anil Parab : जन सुरक्षा विधेयक महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आलं. त्यावर बरीच चर्चा झाली. जनतेपाक्षा राज्यातल्या शिक्षकांना सुरक्षेची जास्त गरज आहे असा टोला उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषेदत लगावला. तसंच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचा व्हिडीओ म्हणजे चड्डी बनियान गँगचा व्हिडीओचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच २८९ च्या मार्फत या ठिकाणी चर्चा घडवून आणावी अशी विनंती अनिल परब यांनी केली.
काय म्हणाले अनिल परब?
दोन ते तीन दिवसांपूर्वी जन सुरक्षा विधेयक आपण आणलं. जनतेची सुरक्षा कशी याची सविस्तर मांडणी इथे करण्यात आली. जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला आधी मंत्र्यांची सुरक्षा करा. चड्डी बनियान गँग किंवा चड्डी टॉवेल गँगचे व्हिडीओ महाराष्ट्रात फिरत आहेत. एखाद्या मंत्र्याच्या बेडरुममधले व्हिडीओ आता बाहेर येऊ लागले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची यामुळे नाचक्की होते आहे. बेडरुममधले व्हिडीओ बाहेर येत आहेत त्यामुळे मंत्रीच सुरक्षित नाहीत. जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला. मंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की महाराष्ट्रातला मंत्रीच सुरक्षित नाही. जन सुरक्षा विधेयक आणलं जातं आहे आणि पैशांची बॅग दिसते आहे तरीही धीट मंत्री पैशांच्या बॅगा दिसत आहेत. माझी विनंती आहे सरकारतर्फे दोन-दोन कपडे तर द्या सगळे उघडे फिरत आहेत असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातले मंत्री उघडे फिरत आहेत त्यांच्या बेडरुममधले व्हिडीओ
अनिल परब यांनी मुद्दा मांडला तेव्हा त्यांच्या या मुद्द्यावर समोरच्या बाकावरुन आम्ही काय बेडरुममध्ये सूट घालून झोपायचं का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अनिल परब म्हणाले, “महाराष्ट्रातले मंत्री उघडे फिरत आहेत. बेडरुम मधला व्हिडीओ कसा बाहेर कसा आला? मी बेडरुममध्ये सूट घालून झोपा म्हणतच नाही. पण बेडरुमपर्यंत यंत्रणा पोखरली गेली आहे हे मी सांगतो आहे. डिजिटलायजेशन फ्रॉड मंत्र्यांच्या घरात गेला आहे. मंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसं कशी सुरक्षित राहतील. आधी मंत्र्यांना सुरक्षा द्या मग जनतेला सुरक्षा द्या असं मी २८९ च्या अंतर्गत माझी मागणी आहे. या गोष्टीवर चर्चा घेतली पाहिजे.” अशी मागणी अनिल परब यांनी केली.