भारताला आज खंबीर नेतृत्त्वाची गरज असून मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश पुढे जाण्यासाठी राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली. यावरून राज ठाकरेंवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, राज ठाकरे काल चुकचुकल्यासारखे आणि सैरभैर दिसत होते. त्यांना काय म्हणायचं होतं हेच कळेना. त्यांनी मोदींवर टीका केली, नोटाबंदी, बेरोजगारीवर बोलले, त्यांचं काम आतापर्यंत नीट नव्हतं म्हणून टीका केली. मधूनच उद्धव ठाकरेंवरही टोला मारायचे. पण प्रत्येकवेळी जस्टिफिकेशन देत होते. आधी मी भाजपाचे समर्थन करत नव्हतो. आणि आता करणार आहे, याचं ते जस्टिफिकेशन करत आहेत.

हेही वाचा >> Maharashtra News Live : “राज ठाकरेंना कोणी ओळखलंच नाही”; मनसेच्या ज्येष्ठ नेत्याचं विधान चर्चेत

ईडीचं चक्र होतं म्हणून…

“ऐरवी जसे राज ठाकरे बोलतात, तसं कालचं भाषण नव्हतं. त्यांची खुमासदार शैलीही नव्हती. ते बहुतेक त्यांच्या मनातसुद्धा कन्फ्युज होते. त्यामुळे त्यांच्या भाषणानंतर मी ट्वीटही केलं की केहना क्या चाहते हो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक आले होते. पहिल्यांदाच त्यांनी छोटंसं भाषण केलं. तेही डिस्टर्ब झाले असतील. भाजपाला पाठिंबा जाहीर करण्याच्या आधी ते म्हणाले की व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. आणि स्वतःच त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. ईडीचं चक्र होतं म्हणूनच बिनशर्त पाठिंबा दिला का? इतकं काय लोककल्याण करणारे राजकारणी उरलेले नाहीत”, असा टोलाही त्यांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे काय म्हणाले?

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून आपले त्यांच्याशी चांगले संबंध असून ते देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी सर्वांत प्रतम जाहीर अपेक्षा आपणच व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर नोटबंदी, बुलेट ट्रेन या प्रकल्पांना आजही आपला विरोध कायम असून त्यांच्या न पटणाऱ्या धोरण, निर्णयावरही टोकाचा विरोध केला होता. मात्र जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम कायदा, समान नागरी कायदा, याचे समर्थन करणाऱ्यांमध्ये आपणच पहिले होतो, होतो, असेही राज म्हणाले.