नगर: महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय घेतला, या निर्णयाला विरोध करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी  १४ पासून राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील श्री संत यादवबाबा मंदिरात उपोषणाचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बरबादीकडे जाणारी युवाशक्ती व संस्कृतीची होणारी अधोगती पाहायला लागू नये, यासाठीच आपण बेमुदत उपोषण करत असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हजारे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. त्यानंतर निर्णय मागे घेण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला. परंतु सरकारने त्यांच्या पत्राला प्रतिसाद न दिल्याने अखेर हजारे यांनी बेमुदत उपोषणाचा निर्णय जाहीर केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare hunger strike from 14 to protest against wine selling policy akp
First published on: 10-02-2022 at 00:12 IST