scorecardresearch

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता आग्रा किल्ल्यावर साजरी होणार शिवजंयती; पुरातत्व खात्याने दिली परवानगी

पुरातत्व खात्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे.

archeology department permission to celebrated shivjayanti
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

पुरातत्व खात्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे. आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’मध्ये शिवजयंती साजरी करता येईल, असं पुरातत्व खात्याकडून सांगण्यात आलं आहे. या निर्णयानंतर देशभरातील शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – “…म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना माघारी बोलवलं”, मनसे नेत्याचं विधान

महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना वारंवार परवानगी नाकारण्यात आली होती. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आता पुरातत्व खात्याने शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – शिंदे गटाला ‘टेस्ट ट्यूब बेबी’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमचे बाबा…”

आग्रा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांना याच ठिकाणी कैदेत ठेवलं होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीनं सुखरूप सुटका करुन घेतली. त्यामुळे या ठिकाणी शिवजयंतीचा सोहळासाजरा व्हावा अशी अनेकांनी मागणी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 19:01 IST
ताज्या बातम्या