scorecardresearch

Dasara Melava 2022: “अगोदर पेपर फोडणार नाही पण…” शिंदे गटाच्या मेळाव्याबाबत अर्जुन खोतकरांचं सूचक विधान

शिवसेना आमदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबतच्या कृपाल तुमानेंच्या दाव्यावर भाष्य करण्यास खोतकर यांनी टाळलं आहे

Dasara Melava 2022: “अगोदर पेपर फोडणार नाही पण…” शिंदे गटाच्या मेळाव्याबाबत अर्जुन खोतकरांचं सूचक विधान
(फोटो सौजन्य- अर्जुन खोतकर यांच्या ट्विटरवरुन)

मुंबईत आज होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यावर राज्यात सर्वांच्याच नजरा खिळल्या आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. अगोदर पेपर फोडणार नाही, पण शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे मोठा धमाका करतील, असे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंद धमाके करण्यासाठीच ओळखले जातात, असेही त्यांनी म्हटले आहे.

Dasara Melava 2022: मेळाव्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री शिंदेंचं Tweet; मराठी, हिंदुत्वाचा उल्लेख करत म्हणाले, “आपण…”

दरम्यान, शिवसेनेतील दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. या दाव्यावर भाष्य करण्यास टाळताना खोतकर यांनी सूचक इशारा दिला आहे. “राज्याचे ५० आमदार आणि १२ खासदार सोबत आहेत. आज दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. शिंदेंसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे”, असे आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्यानंतर तुमाने यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Dasara Melava 2022: दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का? शिंदे गटाकडून मोठा दावा, म्हणाले “आज बीकेसीत पाच आमदार आणि दोन खासदार…”

तुमानेंच्या या दाव्यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सूरतला, गुवाहाटीला गेले, तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी आमदारांना डांबून ठेवण्याची, हॉटेलमध्ये बंदिस्त करण्याची भूमिका घेतलेली नाही. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं आणि सोबत राहायचं आहे त्यांनी स्वेच्छेने राहावं ही त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी कोणावरही जबरदस्ती केली नाही”, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या