सीताराम चांडे

राहाता : शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा काँग्रेस पक्षाला न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या युवा नेत्या व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षां रुपवते यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रुपवते वंचितह्णच्या तिकिटावर बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Pune Lok Sabha, Pune ,
मतदारसंघाचा आढावा : पुणे; पुणे भाजप की काँग्रेसचे ?
Pune Lok Sabha, Pune ,
मतदारसंघाचा आढावा : पुणे; पुणे भाजप की काँग्रेसचे ?
mahayuti seals seat sharing pact in maharashtra
महायुतीतील पेच दूर; ठाणे, नाशिकमध्ये शिवसेनेचेच उमेदवार, भाजपच्या वाटयाला २८ मतदारसंघ, शिंदेंना १५ तर अजित पवार गटाकडे ४ जागा
Congress will contest Mumbai president Prof Varshan Gaikwad from North Central Mumbai Lok Sabha constituency
शिवशक्ती-भीमशक्तीचा मुंबईत नव्याने प्रयोग; वर्षां गायकवाड यांच्या उमेदवारीने संकेत
Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंचं मत मशालीला नाही, मग कुणाला? उमेदवाराचं नाव सांगत म्हणाले, “यावेळी…”
Nandurbar lok sabha seat, dr heena gavit Objects to Congress Candidacy Application, BJP candidate dr heena gavit, Gowaal Padavi s Candidacy ApplicationCongress Candidate Gowaal Padavi, marathi news, nandurbar news,
नंदुरबारमध्ये काँग्रेसची उमेदवारी धोक्यात ? भाजपच्या डॉ. हिना गावित यांची हरकत
Varsha Gaikawad Congress
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर; भाजपाकडून पूनम महाजन यांच्याबाबत मौन
eknath shinde bhavna gavli hemant patil
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव अंतिम झाल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या उत्कर्षां रुपवते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी मुंबईत वंचितह्णचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राजगृहावर भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रुपवते या तिसऱ्या आघाडीच्या संपर्कात असल्याने त्यांची बंडखोरी निश्चित मानली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असल्याने आपल्या नावाची घोषणा होईल, अशी रुपवते यांना खात्री होती; परंतु या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज आहेत.

हेही वाचा >>>“मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा एकमेव आमदार”, हर्षवर्धन जाधव लढवणार लोकसभा निवडणूक; पण कोणत्या पक्षातून?

उत्कर्षां रुपवते यांना, काँग्रेसचे निष्ठावंत माजी मंत्री स्व. दादासाहेब रुपवते व विधानसभेचे माजी सभापती स्व. मधुकरराव चौधरी यांची नात व वडील बहुजन शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. प्रेमानंद रुपवते असा मोठा राजकीय वारसा आहे. त्यांना उमेदवारी नाकारल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांचे समर्थक व काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आहेत. प्रेमानंद रुपवते यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्कर्षां रुपवते यांनी गेल्या दोन वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला.

महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल अशी त्यांना खात्री होती. मात्र ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने रुपवते समर्थकांमधून नाराजी आहे. शिर्डीचे वातावरण पूरक असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायचीच असा चंग त्यांच्या समर्थकांनी बांधला आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या रुपवते यांनी स्वत:च्या समाजमाध्यम खात्यावरून काँग्रेस नेत्यांचे फोटो हटवले आहेत. रुपवते यांनी वंचितह्णकडून निवडणूक लढवल्यास शिर्डीची निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की!

हेही वाचा >>>साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू

‘मविआ’साठी अडचण

अनेक वर्षांपासून रुपवते कुटुंबीय कॉग्रेसशी एकनिष्ठ आहे. उमेदवारी न दिल्याने उत्कर्षां रुपवते काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्य महिला आयोगाच्या सदस्य, महाराष्ट्र कँाग्रेसच्या राज्य सरचिटणीस, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय असा त्यांचा परिचय आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सर्वच पक्षांनी बौद्ध समाजाला डावलण्याचा प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत केला असल्याचा आरोप बौद्ध समाजाने केला आहे. त्या काय निर्णय घेतात यावर बरेच काही अवलंबून आहे.

वारसा संघर्षांचा आहे

उत्कर्षां रुपवते यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही. त्यांना लघुसंदेश पाठविला असता, मी बैठकीत आहे, नंतर संपर्क साधते असे प्रतिउत्तर पाठविले. समाजमाध्यमावर त्यांनी आजोबा दादासाहेब रुपवते व मधुकरराव चौधरी व वडील प्रेमानंद रुपवते यांच्या फोटोसह ‘काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षांचा आहे’ असा मजकूर टाकल्याने चर्चेला उधाण आले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या उत्कर्षां रूपवते यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.