कर्जत: केंद्रीय कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या देशव्यापी संपात कर्जतमधील आशासेविका आणि गटप्रवर्तकांनी सहभाग नोंदवत पंचायत समिती व तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी घोषणाबाजीने परिसर दणाणला होता.

संघटनेच्या तालुकाध्यक्ष लंका पठाडे या वेळी म्हणाल्या, आशासेविकांना मानधन वेळेवर मिळावे, तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. नाजिया पठाण यांनी केंद्रांवरील अडचणी आणि आशासेविकांच्या समस्या मांडल्या. तालुका आरोग्याधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेच्या पदाधिकारी राणी गदादे, सारिका शिंदे, रोहिणी नलवडे, इर्शाद बेग, इंदू चव्हाण, रेखा देवकर, सुनीता गोडसे, माधुरी भगत, संगीता कानडे, स्वाती काळे, गवळी, आशा साबळे, रुकसाना शेख, स्वाती गवळी, अनिता रसाळ, बबई मोरे, अनिता निभोरे, अनिता मंगल कांबळे, शुभांगी गोहेर, उवा रोडे, शैला सिपणे, वर्षा सस्ते, स्वाती पेठकर, इसीना शेख, रजन्ना खटाळ, महानंदन कदम, शीतल सूर्यवंशी, वंदना रोटे, रुपाली कोकाटे, मोनाली झोडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.