लोकसत्ता वार्ताहर

जालना : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून २४ लाख ५४ हजारांची रोकड चोरट्यांनी पळवली. कारमधून आलेले चोरटे सीसीटिव्ही कॕमेऱ्यात कैद झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजली.

जालना शहरातील महावीर चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी घडली. २४ लाख ५४ हजारांची रोकड चोरट्यांनी एटीएम फोडून लंपास केलीय. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले व त्यातील एकुन २४ लाख ५४ हजार ३०० रुपयांची रक्कम चोरून नेलीय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. अज्ञात चोरटे क्रेएटा कंपनीच्या चार चाकी गाडीत महावीर चौकात आले आणि पाणी वेस मार्गे पुढे निघून गेले.

आणखी वाचा-लोकसभा निवडणुकीत आ. जयंत पाटील यांनी घेतल्या तब्बल १०३ सभा

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,सदर बाजार पीलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पंकज जाधव, उपनिरिक्षक भगवान नरोडे डी, बी, पथक सदर बाजार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांनी एटीएम च्या सीसीटिव्हीचे डिव्हीआर सुध्दा पळवून नेले आसून चोरटे सीसीटिव्ही कॕमेऱ्यात कैद झाले असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात कलम ३७९, ४६१ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, सदर बाजार पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झालेत. पोलीस उप निरिक्षक भगवान नरोडे घटनेचा पुढील तपास करत आहेत.