हिंगोली शहरात या पूर्वी एटीएम फोडण्याचा प्रकार चांगलाच गाजला असताना आता पुन्हा एटीएम सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून एटीएम धारकांना फोन करून, कोड नंबर विचारून घेत गंडविण्याचे प्रकार सुरू झाल्याने येथील एटीएम सेवा चांगलीच विस्कळीत झाली आहे. यापूर्वी २० गुन्हे दाखल झाले असताना त्यात दोघांना गंडविल्याने नवीन भर पडली.
यापूर्वी बँक खातेहॅक करून पसे लांबविण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडत होते. इतकेच नाही तर शास्त्रीनगर भागात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून कर्मचाऱ्यांनीच ९ लाख पळविले होते. तपासाअंती आरोपीला अटक करण्यात आली. हे प्रकरण जिल्हाभर गाजले होते. या प्रकरणावरील चर्चा थांबते न थांबते तोच अज्ञात व्यक्तींकडून एटीएम धारकांना फोनवरून कोड नंबर विचारून घेत गंडविण्याचे प्रकार घडत आहेत. अशा सुमारे २० घटना घडल्या आहेत. नाईकनगर येथील दिलीप घुगे यांच्या मुलीच्या बँक खात्यावरून काही रक्कम काढण्यात आल्याची तक्रार ८ मे रोजी पोलिसात आली होती.
२ मे रोजी कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील कोंडबाराव मगर यांना दुपारी २ च्या सुमारास ९६६१७८६०१८ या भ्रमणध्वनीवरून फोन आला. तुमचे एटीएम कार्ड काही दिवसात लॉक होईल, असे सांगत त्याने एटीएम कोडची विचारणा केली असता मगर यांनी अज्ञात व्यक्तीला एटीएम कोड सांगितला असता त्यानंतर दुपारी २ ते ८ यादरम्यान कोंडबाराव मगर यांच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या खात्यातून १८ हजार ५०० रुपये परस्पर काढून घेतल्याचा संदेश आला. आपली फसवणूक झाल्याचे मगर यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलिसात ९ मे रोजी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atm service high alert
First published on: 11-05-2015 at 01:54 IST