Devendra Fadnavis Slams Congress For Bhagawa Dahashtwad: मालेगावात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एएनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि पक्षांकडून त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी काँग्रेसवर टीका केली असून, काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

हे २००८ चे षड्यंत्र सर्वांसमोर आले आहे. त्या काळातील सरकारने मतांच्या राजकारणासाठी “हिंदू टेरर” आणि “भगवा दहशतवाद” या शब्दांचा वापर केला. तुम्हाला माहित असेल की, संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत होते, तेव्हा इस्लामिक दहशतवाद चर्चेत होता. यामुळे आम्हाला जे मत देणारे लोक आहेत, त्यांचा रोष ओढवू नये म्हणून हिंदू दहशतवाद ही थेअरी निर्माण करण्यात आली. लोकांना अटक करण्यात आली आणि हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना टार्गेट करण्याचे षड्यंत्र होते. पण अनेक प्रयत्न करूनही त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळू शकले नाहीत. काही स्वयंसेवक असे होते की, ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव होता.

ते पुढे म्हणाले की, “इस्लामिक दहशतवाद त्यावेळीही होता आणि आजही आहे. पण असे कोणी म्हटलेले नाही की, सर्व मुस्लिम दहशतवादी आहेत. तरीही हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला होता.”

मालेगाव प्रकरणाच्या निकालावर कालही प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले होते की, “काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगून चालन करण्यासाठी हिंदू दहशतवाद आहे, भगवा दहशतवाद आहे, अशा प्रकारचा प्रचार केला होता, तो प्रचार किती खोटा होता हे आज उघड झालं आहे. ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, तो प्रयत्न किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्यानिशी सांगितलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा बॉम्बस्फोट कोणी केला? हे पोलीस सांगतील. तसेच त्या वेळच्या तपास यंत्रणांनी काय तपास केला? हे विचारावं लागेल. आता सर्वांना कल्पना आहे की उद्धव ठाकरे आता ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत. त्यांचं सरकार (काँग्रेस) त्यावेळी होतं. त्यामुळे त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे. भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह पसरवण्याचा हा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं. पण आता तेही लांगून चालन करण्याच्याबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे ते असं अभिनंदन करणार नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.