scorecardresearch

Premium

पीक विमा भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न – धनंजय मुंडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज नाशिकमधील दौऱ्यात राष्ट्रवादीकडून स्वागतासाठी लावलेल्या शुभेच्छाफलकांवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे, त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लागला आहे.

Dhananjay-Munde-13
धनंजय-मुंडे

नगर: पीक विम्यासंदर्भातील अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. विमा कंपन्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड व ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नगरमध्ये आज, शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज नाशिकमधील दौऱ्यात राष्ट्रवादीकडून स्वागतासाठी लावलेल्या शुभेच्छाफलकांवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे, त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लागला आहे. या संदर्भात मुंडे म्हणाले, की ज्या शरद पवारांना आम्ही दैवत मानतो, त्या देवाने आम्हाला भक्तांना फोटो वापरण्यास मनाई केली आहे. कायदेशीर कारवाई करेल असे सांगितले. मग आम्ही काय करायचे? तेव्हा आमच्यावर कायदेशीर कारवाईची वेळ देवावर येऊ नये म्हणून त्यांच्याऐवजी ते ज्यांना गुरू मानत होते, त्या यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र आम्ही लावले. 

Nitish Kumar New cm of bihar
नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
Justice done to Maratha community on Anand Dighes birth anniversary says cm Eknath Shinde
आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
CM EKnath SHinde in Farm
हाती घेतले फावडे अन् ट्रॅक्टरही चालवला; शेतीकामात रमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ओठी शांता शेळकेंच्या ‘या’ ओळी!
liquor bottles Subhash Chandra Bose memorial nagpur municipal corporation marathi news
नागपुरात सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाजवळ मद्याच्या रिकाम्या बाटल्या! विविध संघटनांकडून संताप व्यक्त

कांदा व टोमॅटोच्या भावावरून शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवले. या संदर्भातील प्रश्नावर मंत्री मुंडे यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. ते म्हणाले, की जेव्हा शेतकऱ्यांना ऐतिहासिक २७१० रुपये भाव दिला गेला, त्या वेळेस माध्यमांना ती बातमी करावीशी वाटली नाही. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मी अशा तिघांनी बैठक घेतली. आणखी दोन लाख टन कांदा विकत घेण्याचा निर्णय घेतला. या कांद्याला २१५० रुपये भाव देऊन तो विकत घेणार आहोत. हा ऐतिहासिक निर्णय आहे. मात्र, विरोधाला विरोध करायचे व माध्यमे उपद्रव मूल्याला जास्त महत्त्व देऊ लागल्याने उपद्रवमूल्य वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अशा गोष्टी घडत आहेत, असाही दावा मुंडे यांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempt to pay crop insurance compensation before diwali dhananjay munde ysh

First published on: 08-10-2023 at 03:17 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×