नगर : राज्य सरकारच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत (२०२१-२२)’ नगर जिल्ह्याने तीन पुरस्कार पटकावले आहेत. अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय (१० लाख रु.), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (शासकीय अधिकारी गट, ५० हजार रु.) व राहाता पंचायत समिती (४ लाख रु.) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल यांनी आज, सोमवारी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. प्रशासन सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्यासाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ हे अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना किंवा उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देण्यात येतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Award office superintendent police collector decision administration campaign competition ysh
First published on: 19-04-2022 at 00:09 IST