३० जानेवारी रोजी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाचही जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

‘एबीपी माझा’शी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “आम्हाला पाचही जागा लढवायच्या आहेत, असं आम्ही आमच्या बैठकीत ठरवलं आहे. कोकण, अमरावती, मराठवाडा, नागपूर आणि नाशिक येथील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या जागांबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून चर्चा करत आहोत.”

Ranjitsinh Mohite patil, Madha Lok Sabha,
माढ्यात आमदार रणजितसिंह मोहिते भाजपकडून अघोषित बहिष्कृत
Jan Vikas Foundation supports Dr Prashant Padole of Congress
भंडारा : जनविकास फाऊंडेशनचा काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळेंना पाठिंबा, माजी आमदार चरण वाघमारेंची भूमिका स्पष्ट
Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र

हेही वाचा- VIDEO: “आम्ही पुरुष दररोज लैंगिक संबंध ठेवतो, पण…”, भरमंचावरून नितीश कुमारांचं विधान

“याआधीही आम्ही सगळी माहिती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना दिली होती. आम्ही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या पाचपैकी किमान एक-दोन जागा आम्हाला सोडाव्यात,” अशी मागणी बच्चू कडूंनी केली.

हेही वाचा- मोठी बातमी: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही; बच्चू कडूंचं सूचक विधान

बच्चू कडू पुढे म्हणाले, “सरकारला पाठिंबा दिला म्हणजे तुम्ही नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवावी, असं परिपत्रक काढलं नव्हतं. याबाबत आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनीच यावर तोडगा काढावा. आम्हाला मराठवाड्यातील किमान एकतरी जागा मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे,” असंही बच्चू कडू म्हणाले.