गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा आमदार बच्चू कडू हे मंत्रीपदासाठी इच्छूक होते. परंतु, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्याबरोबर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण नऊ आमदारांना मंत्रीपदं मिळाली. परंतु, शिंदे गटातील अनेक आमदार तसेच बच्चू कडूंना मात्र मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदार तसेच बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात आहे. काही आमदारांनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. बावनकुळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करणार आहे की नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा. विधानसभेच्या अधिवेशनासाठी मंत्र्यांनी-आमदारांनी नागपूरला येण्यापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार करावा.

बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली. यावेळी बच्चू कडू म्हणाले, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ देऊ नका. त्यांना म्हणावं आता थेट २०२४ लाच विस्तार करा. त्या विस्तारामध्ये बच्चू कडूंची भूमिका बिलकूल मजबूत राहील.

हे ही वाचा >> हे ही वाचा >> मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बच्चू कडू यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बच्चू कडू म्हणाले, माझ्या नाराजीचा काही संबंध नाही. आमची नाराजी दूर करणारा अजून कोणी निर्माण झाला नाही. मी काही नाराज नाही. मी नाराज आहे, असं तुम्हाला वाटतं का? मी एवढा हसून बोलून राहतोय, तुम्हाला नाराज वाटतोय का? तुम्हाला पार्टी हवी असेल तर सांगा, तुम्हाला जेवायची पार्टी देतो.