महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडेच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर घडलं आहे. हे सत्तांतर घडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार असाममधील गुवाहाटीला गेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनाक्रमानंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा गुवाहाटीला जाण्याची इच्छा व्यक्त केली. याच इच्छेला जोडून पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात काही प्लॅनिंग सुरू आहे का? असं विचारलं असता बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं. आम्ही फार चर्चा करत नाही, आम्ही थेट अॅक्शन करतो, असं विधान बच्चू कडू यांनी केलं. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा- “शरद पवारांनी आधीपासूनच घाण आणि नीच…”, गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली!

पुन्हा कुणासोबत गुवाहाटीला जाण्याचं प्लॅनिंग सुरू आहे का? असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “आमच्या प्लॅनिंगबद्दल तुम्हाला काहीही सांगितलं नाही पाहिजे. आम्ही एकदम गुवाहाटीला गेल्यावरच तुम्हाला माहीत होईल, तेव्हा थेट ब्रेकिंग न्यूज करा,” असं विधान बच्चू कडू यांनी केलं. बच्चू कडू यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा- पिक्चर अभी बाकी है? शरद पवारांवरील गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचं आणखी एक मोठं विधान, म्हणाले…

दरम्यान, बच्चू कडू यांनी महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळ विस्तारावरही भाष्य केलं आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले, “काही लोक मंत्री झाले. पण मी एक मंत्रालय निर्माण केलं आहे. मंत्रालय निर्माण करणं महत्त्वाचं आहे की मंत्री होणं महत्त्वाचं आहे, हा फरक समजून घ्यायला हवा. आता या देशात नव्याने मंत्रालय निर्माण झालं आहे. गुवाहाटीला गेल्यामुळे ते झालं असेल तर आम्ही पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊ… शेतकऱ्यांसाठी वेगळा मुद्दा घेऊन तिथे जाऊ. आम्हाला खोकेवाले म्हणतात. पण आम्ही मंत्रालयवाले आहोत. ज्याचं कुणी वाली नाही अशा अपंगांसाठी आम्ही जगातील पहिलं अपंग मंत्रालय निर्माण केलं. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu statement on planning to go guwahati one more time rmm
First published on: 15-02-2023 at 21:00 IST