scorecardresearch

Premium

सोलापुरात बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट

यंदा दुष्काळाचे सावट पसरल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बैलपोळा सणात कोठेही उत्साह दिसून आला नाही.

bailpola in solapur
निरूत्साही आणि काळजीवाहू वातावरणात बैलपोळा सण साजरा झाला. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृध्दी येते, असं मानणारा शेतकरी आणि वाळलेला कडबा गोड मानून धन्याच्या सोबत स्वतःही शेतात राबणारा बैल यांच्यातील नात्याने बंध अधोरेखित करणारा बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण. परंतु यंदा दुष्काळाचे सावट पसरल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात बैलपोळा सणात कोठेही उत्साह दिसून आला नाही. अशा निरूत्साही आणि काळजीवाहू वातावरणात बैलपोळा सण साजरा झाला.

राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा फटका, हवामान खात्याचा इशारा
A youth was brutally murdered by four to five people with sticks due to being hit by a bike akola
दुचाकीचा धक्का लागल्याचे कारण झाले अन् भररस्त्यात तरुणाला संपवले
water stock of dam in Nashik district is half
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर
Yavatmal district murders
दोन खुनांच्या घटनांनी यवतमाळ जिल्हा हादरला; आर्णीत जावयाकडून सासऱ्याची हत्या, पांढरकवडात तरुणाला संपविले

यंदा पावसाळ्यात संपूर्ण निराशा केली असून खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. यातच उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा असून इतर लहानमोठी धरणे, नदी-नाले, ओढे कोरडे असल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. विशेषतः सांगोला, माळशिरस करमाळा, पंढरपूर, माढा आदी भागात पावसाने निराशा केली आहे. धरणातील जेमतेम शिल्लक पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव आहे. खरीप पिकांचे उत्पादन कमालीचे घटण्याची परिस्थिती दिसत असताना मुक्या जनावरांना जगविण्यासाठी चाऱ्याचीही टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात केवळ दीड महिना पुरेल इतका चारा शिल्लक असल्याचे बोलले जाते. यातच गाय- बैलांना लम्पी आजाराच्या साथीने पुन्हा पछाडले आहे. जनावरांचे संगोपन करण्याचा खर्च आवाक्याबाहेर जात असताना दुसरीकडे शेतातील कामांसाठी यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे.

आणखी वाचा-सांगली : दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महामार्गावर ठिय्या

या पार्श्वभूमीवर शेतात आपल्यासोबत राबणाऱ्या बैलांबरोबर असलेले नाते टिकविण्यासाठी दुःख बाजूला ठेवून शेतक-यांनी बैलपोळा साजरा केला. एरव्ही, ओढ्यावर बैलांना घासून पुसून आंघोळ घालणारे शेतकरी आज मात्र ओढा कोरडाठाक असल्यामुळे शेतात किंवा वस्तीवर आंघोळ घालून, रंगरंगोटीसह त्यांच्या शिंगांना हिंगूळ, बेगड, आकर्षक गोंडे लावत होते. काही गावात शेतकऱ्यांनी नटवून- सजवून बैलांची वाजतगाजत मिरवणुका काढल्या. मात्र दुष्काळामुळे खरीप हंगाम वाया जात असल्यामुळे बहुतांश ठिकाणी बैलपोळा साधेपणाने साजरा झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज गावात सतीश अर्जुन गवळी या शेतकऱ्याने आपल्या सर्जा-राजा बैलजोडीच्या पोटावर ‘दुष्काळ जाहीर करावा’, अशा मागणीचा मजकूर लिहून ग्रामीण भागातील व्यथा मांडली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bailpola celebration affected by drought in solapur mrj

First published on: 14-09-2023 at 18:47 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×