राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपाने  या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या विनंतीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान, रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपाला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देत म्हटलं होतं की, “आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत”.

बाळासाहेब थोरात यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी आणि नाना पटोले यांनी आज फडणवीसांची भेट घेतली. दरम्यान, भाजपा या विनंतीसंदर्भात काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat and nana patole met opposition leader devendra fadnavis and requested him for rajya sabha elections unopposed hrc
First published on: 23-09-2021 at 13:40 IST