नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आपण जर कुठं बाहेर गावी जाण्याचे ठरत असेल, अथवा रोखीचे व्यवहार करण्याचे नियोजन असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण, या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित सर्व कामं गुरुवारपर्यंतच उरकून घेणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आठवड्यात नाताळ असल्याने शुक्रवार २५ डिसेंबर बँकांना सुट्टी असेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देखील बँका बंद असतील. कारण, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. व यानंतर रविवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.

याशिवाय, नव वर्ष सुरू होताच १ जानेवारीपासून बँकांच्या नियमांमध्येही काही बदल होत असल्याने, बँकेशी संबंधित व्यवहार वेळेतच पूर्ण करून घेणे योग्य ठरणार आहे. तसेच, ३१ डिसेंबर ही आयकर भरण्याची अंतिम तारीख असल्याने, यासाठी बँकेशी संबंधित काही कागदपत्र लागल्यास, बँकांच्या सुट्टीमुळे कामाचा खोळंबा देखील होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banks will be closed for three days in a row msr
First published on: 21-12-2020 at 20:06 IST