अनैतिक संबंधातून एका ९ महिन्यांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजीला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील पंचवटी भागात घडल्याचे वृत्त आहे. या जळीतकांडात चिमुकलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेतील प्रियकर आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या आणि शेजारील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ज्या कुटुंबातील तीन जणांना पेटवून देण्यात आले. हे कुटुंब ३ ऑगस्ट रोजीच पंचवटी परिसरात रहावयास आले होते. त्यानंतर दोनच दिवसांनंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी पहाटे चाडेचार पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून तत्पूर्वी या घरात किरकोळ भांडणं झाल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.

रविवारी या कुटुंबासोबत आरोपीचे किरकोळ भांडण झाल्याचे शेजाऱ्यांनी ऐकले होते. मात्र, त्यानंतर पहाटेच्या सुमारास सर्व झोपेत असताना अचानक या घरातून किंकाळण्याचा आवाज आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी उठून पाहिले तर या घरातील ९ महिन्यांच्या चिमुकलीसह, तिची आई आणि आजी यांना आगीच्या ज्वाळांनी वेढले होते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी ओरडत या दोघीही घराबाहेर पडल्या. दरम्यान, शेजाऱ्यांनी त्यांच्या अंगावर पाणी, आणि ब्लँकेट टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यामुळे गंभीर जखमी झाल्या असल्या तरी दोन्ही महिलांचा जीव वाचला आहे. मात्र, यात चिमुकलीची मृत्यू झाला आहे.

दरम्यान, माध्यमांतील वृत्तांतानुसार हा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असल्याची शक्यता आहे. यातील प्रियकर आरोपी हा मुळचा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी असून तो सध्या फरार झाला आहे. या आरोपींना शोधण्यासाठी नाशिक पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Because of immoral relationship a nine months old girl child her mother and grandmother burnt daughters death
First published on: 06-08-2018 at 12:41 IST