बीड – परळी जवळ असलेल्या कवडगाव ते शिरसी मार्गावर असलेल्या लिंगी नदीला आलेल्या पुरात चारचाकी गाडी वाहून गेल्याची घटना रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली होती. या गाडीतील तिघांना वाचविण्या यश आले असले तरी एकाचा मृत्यू झाला आहे. विशाल बल्लाळ वय २३ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

चारचाकी वाहन पाण्यात वाहून गेल्यानंतर बचाव कार्याला रात्री १२ च्या सुमारास सुरुवात करण्यात आली. पुण्याहून दिग्रसकडे लग्न समारंभासाठी जात असलेल्या कारला कवडगाव हुडा शिवारातील तेलसमुख रोडवर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने चार चाकी गाडी वाहून गेली. या गाडीमध्ये अमर पोळ (वय २५ वर्षे), राहुल पोळ (वय ३० वर्षे) , राहुल नवले (वय २३ वर्षे) व हे रात्री गाडी वाहून गेल्याने पाण्यात अडकले.

परळीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस उपाधीक्षक अंबाजोगाई ऋषिकेश शिंदे यांच्यासह शिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गौरक्षनाथ दहिफळे यांनी बचाव कार्य सुरू केले. तिघांना वाचविण्यात यश आले. एकाचा मृत्यू झाला आहे. परळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी ही माहिती दिली.