ऐतिहासिक वास्तूंच्या प्लास्टरमध्ये कधी तांदळाचा भुस्सा, वाख किंवा वेगवेगळ्या प्रकारचा रस मिसळण्याची पद्धत सोळाव्या शतकात होती. या बांधकाम शैलीतील ‘बीबी का मकबरा’च्या गिलाव्यात रांगोळीसदृश जिओलाईटचे मिश्रण वापरले होते. सेंद्रीय सच्छिद्र पदार्थामुळे आद्र्रता शोषण्याची क्षमता या वास्तूत निर्माण झाली. त्यामुळे दीर्घकाळ गिलावा टिकून राहिल्याचे संशोधन पुरातत्त्व विभागातील मॅनेजर सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. या संशोधनामुळे प्राचीन वास्तू संरक्षित करणे अधिक सोपे होईल. या संशोधनाची दखल ‘जर्नल ऑफ आíकओलोजिकल सायन्स’ मध्येही घेण्यात आली आहे.
विशेष म्हणजे समकालीन बांधकामात दिसून येणारा तांदळाचा भुस्सा किंवा अन्य पदार्थ गिलाव्याच्या दोन्ही थरांत दिसून आले नाहीत. या थरांमध्ये काही सेंद्रीय पदार्थ आढळून आले. त्याचा काही भाग तसा सच्छिद्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे हवेत आद्र्रता अधिक असेल, तेव्हा ती शोषून घेण्याची वृत्ती प्लास्टरमध्ये आल्याचे दिसून येते. या पदार्थाबरोबरच काही पांढरे स्वच्छ कण आढळून आले. त्याला जिओलाईट म्हणता येईल. या रांगोळीसदृश कणांचा समावेश समकालीन बांधकामात दिसून येत नाही. सेंद्रीय पदार्थ व रांगोळीसदृश या पदार्थामुळे ‘बीबी का मकबरा’च्या प्लास्टरचा रंग काहीसा वेगळा असल्याचेही या संशोधनामुळे पुढे आले आहे. या वास्तूला नव्याने कधी प्लास्टर करावे लागल्यास मॅनेजर सिंग यांच्या संशोधनाचा मोठा लाभ होणार आहे. आद्र्रता शोषून घेण्याच्या प्लास्टरच्या वृत्तीमुळे ते दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत झाल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. या संशोधनात पुरातत्त्व विभागातील विज्ञान विभागाचे संचालक, प्रा. डी. एन सिंग, प्रा. कन्नन अय्यर, डॉ. एस. एन देशपांडे, डॉ. डी. ए. गुप्ता यांनी सहकार्य केले.
ऐतिहासिक वास्तूचा गिलावा वर्षांनुवष्रे  टिकतो कसा, या प्रश्नाच्या शोधात अनेक संशोधक आहेत. आईच्या स्मरणार्थ उभारलेल्या ‘बीबी का मकबरा’ या वास्तूला सुमारे ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अलीकडे या वास्तूचा गिलावा काही ठिकाणी उखडू लागला. त्याचे संरक्षण कसे करायचे, असा प्रश्न पुरातत्त्व तज्ज्ञांसमोर होता.
ही वास्तू जतन करायची, तर प्लास्टरमध्ये नक्की .कोणते पदार्थ आहेत, याची तपासणी प्रयोगशाळेत झाली. त्या काळी गिलावा करताना िलबूरस वापरत. सिमेंटपेक्षा अधिक मजबुतीसाठी विविध प्रकारचे रस टाकले गेल्याचे या चाचण्यांतून दिसून आले.