साताऱ्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांचे उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु आहे. अशात सातारा लोकसभा निवडणूक मी लढवणार आहे अशी घोषणा बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंनी केली आहे. देशाचं संविधान वाचवण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे असं बिचुकलेंनी म्हटलं आहे.

साताऱ्यातून उदयनराजे महायुतीकडून लढण्यास इच्छुक आहे. तर महाविकास आघाडी ही जागा कुणाला देणार? हे पाहणंही महत्त्वाचं आहे. अशात आपण साताऱ्यातून लोकसभा लढवणार असल्याची घोषणा अभिजित बिचुकलेंनी केली आहे.

वसंत मोरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Mehbooba Mufti led Peoples Democratic Party
पीडीपीनंही काश्मीरमधून तीन उमेदवार उतरवले निवडणुकीच्या रिंगणात; नॅशनल कॉन्फरन्सशी थेट होणार टक्कर
Prime Minister criticism of the campaign rally in Rajasthan to stop the action of corrupt people
भ्रष्ट लोकांची कारवाई थांबवण्यासाठी एकजूट; राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधानांची टीका
rachana banerjee hugali loksabha
‘सूर्यवंशम’ अभिनेत्री रचना बॅनर्जींनी लोकसभा जिंकण्यासाठी कसली कंबर; उमेदवारी देण्यामागे ममतादीदींचे गणित काय?

हे पण वाचा- ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचकुलेंना मिळाली डॉक्टरेट पदवी! म्हणाले, “माझं योगदान…”

काय म्हटलंय अभिजित बिचुकलेंनी?

“कुठला पक्ष, कुठले नेते, कोण कुणाचे कार्यकर्ते, सतरंज्या उचलणारे आहेत याचं मला काही घेणंदेणं नाही. २००४, २००९, २०१४, २०१९ या चार निवडणुका मी लढवल्या आहेत. माझं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याच्या जनतेने २००९ मध्ये मला १२ हजारांहून जास्त मतदान केलं होतं. आताही तसंच मतदान होईल असं मला वाटतं. छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्र घेऊन देशाला नवी दिशा आणि दशा द्यायची आहे. येणाऱ्या लोकसभेला मी लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करतो आहे. माझ्या संपूर्ण फॅन्सनी आणि सातारकरांनी माझा विचार करावा. मी सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेलं आहे. मला आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या. ” असं बिचुकलेंनी म्हटलं आहे.

उदयनराजे भोसले हे आमचे थोरले बंधू आहेत. राज्यसभेवर ते खासदार आहेत. त्यांना तिकिट मिळतं की नाही ते माहीत नाही. भाजपापुढे ते झुकतात? हा माझा प्रश्न आहे. माझे आचार आणि विचार सगळ्यांना माहीत आहे. मात्र मी स्पष्टपणे सांगतो आहे की मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे हे मी सांगू इच्छितो. असंही बिचुकलेंनी म्हटलं आहे.