Maharashtra Board Practical Exam 2022 Schedule: महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या प्रात्येक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. माहितीनुसार, दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी २०२२ पासून सुरु होतील आणि १४ मार्चपर्यंत चालतील. तर, बारावीच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चच्या दरम्यान होतील. तथापि, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अपडेट्ससाठी, तुम्ही एमएसबीएसएचएसईच्या (MSBSHSE) अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in ला भेट देऊ शकता.

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहेत. तर, बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चला सुरु होणार असून ती ३० एप्रिलपर्यंत चालेल.

३५ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या २०२२च्या परीक्षांना दहावी आणि बारावीचे जवळपास ३५ लाख विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व नियम पाळले जातील असे मंडळाकडून सांगण्यात आलंय. विद्यार्थी आणि शिक्षकांनाही खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२४ जानेवारीपासून शाळा सुरु होणार

करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शाळा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सोमवार, २४ जानेवारी २०२२ पासून राज्यातील ज्या भागात करोना संसर्गाची प्रकरणे कमी आहेत, अशा ठिकाणी शाळा सुरू होणार आहेत. इयत्ता पहिली ते बारावी व पूर्व प्राथमिकसाठीही ऑफलाइन वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.