भाजपने विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अधिकृत यादीत चिंचवड मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काहीजण जणांच्या आनंदावर निर्जन पडले आहे. तर भोसरी मध्ये देखील आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नवचैतन्य आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर भाजपने आज अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. यात भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा देखील समावेश आहे. शंकर जगताप हे एकदा नगरसेवक राहिलेले असून सध्या ते भाजप चे शहराध्यक्ष आहेत. ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत, तर आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे दीर आहेत.

हे ही वाचा…कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला सुगीचे दिवस; अनेक नेते पुन्हा शिवसेनेत येण्याची शक्यता

आमदार महेश लांडगे हे 2004, 2007 आणि 2012 ला नगरसेवक राहिलेले आहेत. 2014 मध्ये अपक्ष तर 2019 ला भाजपमधून महेश लांडगे यांना जनतेने विधानसभेत निवडून दिले होते. आता देखील भोसरी विधानसभेत महेश लांडगे यांची मोठी ताकद आहे. महेश लांडगे यांच्या पुढे शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांचं आव्हान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही.

हे ही वाचा…Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार की पाडणार? मनोज जरांगेंची मोठी घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शंकर जगताप यांच्यापुढे पक्षातील अंतर्गत नाराजी शमवण्याचं मोठं आव्हान असेल. भाजपमधीलच काही माजी नगरसेवक बंड करण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात काही नगरसेवकांनी बैठक घेऊन जगताप यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.