नगर परिषद निवडणूक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास फक्त दोन दिवस बाकी राहिले असताना चिपळूण नगर परिषदेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी व रत्नागिरी नगर परिषदेसाठी दुसरी यादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध केली.

निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्षपदाच्या हमीमुळे शिवसेनेतून भाजपामध्ये आलेल्या नगर परिषद सदस्य सुरेखा खराडे यांच्यासह चिपळूणचे अन्य उमेदवार पुढीलप्रमाणे – वैशाली निमकर (१-अ), संतोष टाकळे (२-अ), रसिका देवळेकर (२-ब), सुधीर चव्हाण (३-अ), साधना कात्रे (४-अ), विठ्ठल चितळे (४-ब), संदीप साडविलकर (५-अ) मजिद अलवारे (७-ब), दीक्षा निवाते (८-अ), आशिष खातू (९-ब), राधा हटकर (१०-ब), निशिकांत भोजने (११-अ) आणि दमयंती नरळकर (१३-अ).  उर्वरित १४ जागांसाठी उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवारही गुरुवारी रात्री उशीरा किंवा उद्या जाहीर केले जातील, असे जिल्हाध्यक्ष माने यांनी नमूद केले.  दरम्यान रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी पक्षाची दुसरी यादी आज पुढीलप्रमाणे – अ‍ॅड. प्रिया लोवलेकर (२-अ), सचिन शिंदे (२-ब), राजश्री मोरे (४-अ), शबाब खान (४-ब), राही सावंत (७-ब), मानसी करमरकर (९-अ), बिपीन शिवलकर (१३-ब), सुशांत चवंडे (१४-अ) यापूर्वी १२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उरलेल्या दहाजणांची यादी उद्याच स्पष्ट होईल, असे चित्र आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidate announced in ratnagiri district
First published on: 28-10-2016 at 00:52 IST