BJP Chandrashekhar Bawankule On NCP Sharad Pawar Ajit Pawar Union : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या सध्या दूरावा पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे निवडून आल्या. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडून आले. या दोन्ही निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला. मात्र आता निवडणुकांचा काळ संपल्यानंतर पवार कुटुंबियांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

यादरम्यान नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी पवार कुटुंबांमध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूर येथे विठुराया चरणी केली. यामुळे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का? यासंबंधी चर्चा सुरू झाल्या आहेत. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

शरद पवाप आणि अजित पवार एकत्र येण्यास भाजपाची ना असण्याचे काही कारण नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत. अजित पवारांच्या मातोश्रींनी पांडुरंगाकडे अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत असे साकडे घातल्याबद्दल बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ते म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे. भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचं काही कारण नाही. त्या पक्षाने, त्यांच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणं योग्य नाही.”

हेही वाचा>> Arvind Kejriwal : “भाजपाच्या चुकीच्या कामांना RSSचा पाठिंबा आहे का?”, केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल; भाजपाने दिलं प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशाताई पवार यांचं पाडुरंगाकडे साकडं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज (१ जानेवारी) सकाळी पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता, विठ्ठलाकडे काय मागणं मागितलं? असे विचारले असता आशाताई पवार यांनी, सर्व पवार कुटुंबं एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत, अशी प्रार्थना विठ्ठलाकडे केली. तसेच राज्यातील जनता सुख-समाधानाने राहू देत, अशीही दोन्ही हात जोडत प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया आशाताई यांनी माध्यमांसमोर दिली.