बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बियाणी यांच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भगीरथ बियाणी हे बीड शहरातील एमआयडीसी परिसरात राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणींनी आज ( ११ ऑक्टोंबर ) सकाळच्या सुमारास गोळी झाडत आत्महत्या केली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी भगीरथ बियाणींना मृत घोषित केलं.

हेही वाचा – पालघर साधू हत्याकांड प्रकरण : महाराष्ट्रा सरकार तपास सीबीआयकडे सोपवण्यास तयार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भगीरथ बियाणींनी आत्महत्या का केली? याबद्दल अद्यापही संभ्रम आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार प्रीतम मुंडे घटनास्थळी दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.