पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये मिळालेल्या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसतील असा विश्वास व्यक्त करत आहेत. दरम्यान गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत स्वागत करत सेलिब्रेशन करण्यात आल्यानंतर आज ते नागपुरात दाखल झाले. यावेळी विमानतळावर फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी हजेरी लावत फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.

गोव्याच्या निकालानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येत असल्याने विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. फडणवीस पोहोचताच विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर विमानतळापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत रॅली काढण्यात येत आहे.

Attempting to go abroad on the basis of fake passport woman arrested from airport
बनावट पारपत्राच्या आधारे परदेशात जाण्याचा प्रयत्न, विमानतळावरून महिलेला अटक
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Malvan, Badlapur, statue of Shivraji Maharaj,
शिवरायांच्या पुतळ्याबाबत बदलापुरात मालवणची पुनरावृत्ती ?
Skywalk for vitthal rukmini Darshan in Pandharpur Approval of the Summit Committee headed by the Chief Minister
पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता
Solapur flight service will be launched tomorrow by the Prime Minister Narendra modi
सोलापूर विमानसेवेचा पंतप्रधानांच्या हस्ते उद्या प्रारंभ
After 75 years of independence ST bus started for the first time in Naxal-affected Gardewada
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…
airport at sea, airport, Difficulties, sea,
शहरबात…. समुद्रात विमानतळ उभारण्यात अडचणी
sanket bawankule vehicle hit and run case
नागपूर हिट ॲन्ड रन: बावनकुळेंच्या वाहनाची गती आरटीओ तपासणार नाही?

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा जो सत्कार, स्वागत मी स्वीकारत आहे तो मोदींच्या आणि टीम गोव्याच्या वतीने असल्याचं म्हटलं. तसंच जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. हे आपल्या लोकांनी दिलेलं प्रेम असून मोदींच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. त्याबद्दल मी आभारी आहे असंही म्हणाले.

महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजपा सरकार पहायला मिळेल असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला. “गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे,” असं फडणवीस म्हणाले.

“राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटलं तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात, याच्यात मला रस नाही. महाराष्ट्रात भाजपाचंच पूर्ण बहुमताचं सरकार मी आणणार,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

“ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजपा नंबर १ राहील आणि भाजपा आपल्या भरवशावर सरकार आणणार,” असं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. नागपूर, मुंबई पालिका निवडणूक असो आम्ही नेहमी तयारच असतो असं सांगताना सध्या स्वतंत्र वाटचाल सुरु असल्याचं फडणवीस म्हणाले.