राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानावरून सध्या राज्यात चांगलाच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. “राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षण परत मिळवू देऊ शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन”, असं विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरून सत्ताधारी पक्षांकडून देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली जात आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर केलेल्या खोचक टीकेवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे फडणवीसांच्या विधानावरून राज्यात प्रत्युत्तरांचा खेळ पाहायला मिळत आहे.

“फक्त बोलायचं आणि कृती करायची नाही”

देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी खोचक प्रश्न केला होता. “फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात. मात्र यापैकी काहीही झालेलं नाही”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. “सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही; हा भाजपाचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,” असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही; त्याचं काय झालं?”

…याचंही भान यांना राहिलं नाही – पडळकर

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या विधानावर आता गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. “महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचीमुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यामुळे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्रजी फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्ष अगोदरच झालं आहे, याचंही भान यांना राहिलं नाही”, असं पडळकर म्हणाले आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी हा टोला लगावला आहे.

तर राजकीय संन्यास घेईन – वाचा सविस्तर

“सरकारने नाकर्तेपणामुळे आरक्षण घालवलं”

“स्वत:च्या नाकर्तेपणामुळे या सरकारने मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं. पुढच्या तीन चार महिन्यात आपण ओबीसींच आरक्षण परत आणू शकतो. खऱ्या अर्थाने आमच्या हाती जर सूत्रं दिली, तर मी दाव्याने सांगतो, ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन”, असं फडणवीस म्हणाले होते. सरकारविरोधात २६ जून रोजी केलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी नागपूरमध्ये ते बोलत होते.

Story img Loader