"...तर उद्याच सरकार कोसळेल" एकनाथ खडसेंच्या विधानावर गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले... | BJP leader Girish mahajan on eknath khadse statement cabinet expansion rmm 97 | Loksatta

“…तर उद्याच सरकार कोसळेल” एकनाथ खडसेंच्या विधानावर गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

एकनाथ खडसेंच्या विधानाचा भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

“…तर उद्याच सरकार कोसळेल” एकनाथ खडसेंच्या विधानावर गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अलीकडेच मंत्रीमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं होतं. राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर उद्या सरकार कोसळेल. त्यामुळे राज्यात सरकार कोसळण्याच्या १५ आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं विधान एकनाथ खडसेंनी केलं होतं.

एकनाथ खडसेंच्या विधानाचा भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एकनाथ खडसे यांनी स्वत:ची काळजी करावी. आमची काळजी करू नये. आमचं सरकार सक्षम आहे, असा टोला महाजनांनी लगावला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री म्हणतात, “अशाप्रकारचं धाडस…”

एकनाथ खडसेंनी मंत्रीमंडळ विस्तारावरून केलेल्या विधानाबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी स्वत:ची काळजी करावी. आमची काळजी करू नये. आमचं सरकार सक्षम आहे. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही सरकार सांभाळायला आणि विस्तार करायला सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका, तुम्ही स्वत:ची करा, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला आहे.

हेही वाचा- “सीएम शिंदेंना धमकी देणारे कोण आहेत? हे…” विनायक राऊतांची अमित शाहांकडे चौकशीची मागणी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रकरणावरही महाजनांनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात वावरत आहेत, त्यामुळे त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असंही महाजन म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“…तर शिवाजी पार्क मिळालं असतं” दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंचं विधान; म्हणाले “वैरभावनेने मी…”

संबंधित बातम्या

VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”
“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
“सुषमा अंधारेंच्या मेंदुला…” राज ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेत्याची जीभ घसरली!
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
“शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी…”, शिंदे गटाचा खोचक टोला; कवितेतून ठाकरे गटालाही केलं लक्ष्य!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: शिवाजीनगर, डेक्कनमधील वीजपुरवठा रविवारी सकाळी बंद; महापारेषणकडून पूर्वनियोजित दुरुस्ती
रविवारच्या मेगाब्लाॅकमधून मुंबईकरांची सुटका; महापरिनिर्वाणदिनानिमित्त मेगाब्लाॅक नाही
Viral Video: 114 kmph वेगानं दुचाकी चालवणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू, दुभाजकाला धडक दिल्याचा थरार कॅमेरात झाला कैद
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार