भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांचा भाऊ व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ब्रम्हानंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी मिरज येथील काही दुकानांवर बुलडोझर चालवला होता. संबंधित दुकानं ज्या जागेवर आहेत, ती जागा आमची आहे, असा दावा ब्रम्हानंद पडळकर यांनी केला. याप्रकरणी १७ जणांनी गोपीचंद पडळकरांच्या भावाविरोधात तक्रार दाखल केली. यावर मिरज तालुका दंडाधिकाऱ्यांसमोर चार सुनावण्या पार पडल्या. तालुका दंडाधिकाऱ्यांनी अंतिम निकाल दिला आहे.

हा निकाल आपल्याच बाजुने लागल्याचा दावा भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. न्यायालयाने आपल्या बाजुने निकाल दिल्यामुळे संबंधित जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात आपण कायदेशीर कारवाई करणार आहे. तसेच हा निकाल लागण्यापूर्वी आणि निकाल लागल्यानंतर आमच्याविरोधात ज्यांनी चुकीचे आरोप केले, त्यांच्याविरोधात आपण अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असं पडळकरांनी म्हटलं आहे. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

संबंधित वादग्रस्त जागेबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावर भाष्य करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “या निकालपत्रात न्यायालयाने म्हटलं आहे की, ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावावर ७८४ (१)(अ) हा प्लॉट आहे. ज्या १७ लोकांनी या जागेसंदर्भात तक्रार दाखल केली आहे, त्यांचा या प्लॉटशी काडीमात्र संबंध नाही. संबंधित तक्रारदारांचा संबंध ७८४ (१) (ब), आणि ७८३ या गटाशी आहे.हा निकाल आमच्याबाजुने लागला आहे. त्यामुळे आमच्या जागेत कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रितसर कायदेशीर कारवाई करून या लोकांना तेथून बाजुला काढणार आहे.” ७८४ (१) (अ) हा १९ गुंठ्यांचा प्लॉट असून याच्याशी १७ जणांपैकी कुणाचाही संबंध नाही, असं तहसिलदारांनी निकालात नमूद केलं आहे, असंही पडळकर म्हणाले.

हेही वाचा- “शरद पवार आजही भाजपाबरोबर” प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्धव ठाकरेंसोबत…”

पडळकर पुढे म्हणाले, “हा निकाल लागण्यापूर्वी आणि निकाल लागल्यानंतर आमच्याविरोधात ज्यांनी-ज्यांनी चुकीच्या पद्धतीने विधानं केली आहेत. त्यांच्याविरोधात मी या निकालाच्या आधारे अब्रु नुकसानीचा दावा करणार आहे. आमच्याविरोधात तक्रार करणाऱ्यांनी तहसीलदारांकडे जे पुरावे सादर केले, ते पुरावे ७८४ (१) (ब), ७८३ आणि ७८४ शी संबंधित आहेत. त्यामुळे या तक्रारदारांचा आमच्या जागेशी काडीमात्र संबंध नाही.”