सोलापूर : पुण्यात जवळच्या साथीदारांनी हत्या केलेल्या कुविख्यात गुंड शरद मोहोळ याचे सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्च्याप्रसंगी उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न झाला. शरद मोहोळ याने हिंदू धर्म, देव आणि देशासाठी आयुष्य वेचले. तुळजाभावानी माते त्याला आपल्या चरणी जागा द्यावा आणि त्यास पुनर्जन्म देऊन पुन्हा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पाठवावे, असे तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार टी. राजा यांनी सांगितले.

सभेला प्रत्यक्ष हजर राहणार होता

शरद मोहोळ हा देशभक्त होता. त्याने एरवडा कारागृहात एका दहशतवाद्याला ठार मारले होते. त्याची पत्नीसुध्दा हिंदू धर्मासाठी काम करते. ती सोलापुरात हिंदू जन आक्रोश सभेला येणार होती. परंतु हिंदू धर्मातील गद्दारांनी शरद मोहोळची हत्या केली. या गद्दारांना ओळखा, असेही विधान टी. राजा यांनी केले.

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

हेही वाचा : चिथावणीखोर भाषणांबद्दल सोलापुरात नितेश राणे व टी. राजांवर गुन्हा दाखल

शरद मोहोळ आणि आपण यापूर्वी शिर्डीजवळ श्रीरामपुरात हिंदू जन जागरण सभा घेतली होती, अशी आठवणही नमूद करून टी. राजा यांनी शरद मोहोळचे गोडवे गात त्यास श्रध्दांजली अर्पण केली.