राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करुन हे सरकार आलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरगुती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी टोला मारला होता. त्याला आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजापाने मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केलं, हे पवार कुटुंबियांचे दुख आहे, अशी टीका पडळकर यांनी सुळेंवर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना गोपीचंद पडळकर बोलत होते. “महाराष्ट्रातील पवार कुटुंबीय सोडून कोणी मोठं नाही, हे सुप्रिया सुळेंना वाटतं. शरद पवार राज्यात काहीतरी राजकीय बदल करु शकतात याला एकनाथ शिंदेंनी छेद दिला. अजित पवारांनी सुद्धा बंड केलं होते. मात्र, त्यांच्यासह २ आमदार राहिले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ५० आमदार राहिले. त्यांच्यापोटातील दुखणं वेगळं आहे. ते बोलत आहेत वेगळं आहेत,” असा टोमणाही पडळकर यांनी सुप्रिया सुळेंना मारला आहे.

“गणपतीसाठी घरी गेले तर, तुम्हाला…”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या प्रकारे काम करत आहेत. जनतेचाही त्यांना पाठिंबा आहे. अडीच महिन्यात घेण्यात आलेले निर्णय अडीच वर्षांतही झाले नाहीत. मागील सरकारमधील मुख्यमंत्री दोन वर्षे मंत्रालयात आले नाही. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रात्रंदिवस जनतेसाठी वेळ देत आहेत. गणपतीसाठी ते घरी गेले तर, तुम्हाला का वाईट वाटत आहे,” असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

“साम, दाम, दंड, भेद याचा वापर करुन ओक्के सरकार स्थापन झालं आहे. अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाही आहे. ज्या उत्साहाने आमचं सरकार पाडलं, त्या उत्साहाने काम होत नाही. गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या बातम्या दिसत नाही. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते मुख्यमंत्री मला कोणाच्या तरी घरी दिसतात,” असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla gopichand padalkar attacks mp surpiya sule ssa
First published on: 05-09-2022 at 14:27 IST