scorecardresearch

Premium

कराड: बॉम्ब टेस्टिंगवेळीच ‘तो’ स्फोट झाल्याचा नितेश राणेंचा आरोप; राष्ट्रविरोधी कृत्यात कुणाचीही गय होणार नसल्याचा इशारा

या एकंदर प्रकरणातील गुन्हेगारांची पोलीस पाठराखण करीत असून, यात राजकीय हस्तक्षेपही असल्याचा आरोप त्यांनी केला

bjp mla nitesh rane claim explosion during bomb testing not due to gas cylinder leak in akola
भाजप आमदार नितेश राणे

कराडच्या मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोंबरच्या सकाळी झालेला गंभीर स्फोट हा गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झालेला नसून, तो बॉम्ब टेस्टिंगवेळी झालेला स्फोट असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. या घटनेची चौकशी दहशतवाद विरोधी पथकाने करावी अशी मागणी करताना, आपण हे प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनात लावून धरणार असल्याचे ते म्हणाले.

सामाजिक कार्यकर्ते शरीफ मुबारक मुल्ला (३५) यांच्या घरात झालेल्या या स्फोटात चार-पाच घरे, सहा दुचाकींचे नुकसान होताना, शरीफ मुल्ला यांच्यासह त्यांची पत्नी सुलताना (३३), दोन लहान मुले व नजीकच्या घरातील असे एकूण आठ ते नऊजण जखमी झाले होते. त्यात जखमी मुल्ला कुटुंबीयांची प्रकृती गंभीर होती. दरम्यान, घटनेच्या आठव्या दिवशी सुलताना मुल्ला यांचा तर, लगेचच दोन दिवसांनी शरीफ मुल्लांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला होता.

Suicide of minor married girl funeral was done mutual case was registered after two months
अल्पवयीन विवाहित मुलीची आत्महत्या; अंत्यविधी परस्पर उरकला; दोन महिन्यांनी गुन्हा दाखल
deepak kesarkar s banner with retirement suggestions text appeared at various places in sindhudurg at vengurle taluka
सिंधुदुर्गात केसरकरांच्या विरोधात बॅनरबाजी; भाजप शिवसेनेतील बेबनाव चव्हाट्यावर
Sanjay Raut
“शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा”, ठाकरे गटातील नेत्याला धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sharad Pawar ANil Deshmukh FB
“…तेव्हा फुटलेल्या आमदारांची घरवापसी होईल”, अनिल देशमुखांनी सांगितल्या शरद पवार गटातील पडद्यामागच्या हालचाली

हेही वाचा >>> सोलापुरात पावसाच्या सरी; तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दिवाळी बाजारपेठांवरही पावसाचे सावट

दरम्यान, या स्फोटाच्या घटनेबाबत उलट-सुलट चर्चा, अनेक शंका-कुशंका वर्तवल्या जात होत्या. याच पार्श्वभूमीवर आज बुधवारी आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळावरील माहिती घेत पत्रकार परिषदेत  हा गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झालेला स्फोट नसून, राष्ट्रविरोधी कारवाईसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉम्बच्या टेस्टिंगवेळी झालेला हा स्फोट आहे. ही गंभीर बाब असल्याचा आरोप त्यांनी केला.

शरीफ मुल्लाचा त्यांनी जिहादी म्हणून उल्लेख करताना, पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. या एकंदर प्रकरणातील गुन्हेगारांची पोलीस पाठराखण करीत असून, यात राजकीय हस्तक्षेपही असल्याचा आरोप त्यांनी केला. हे सारे प्रकरण अतिशय गंभीर आणि देशाच्या सुरेक्षेला बाधा आणणारे असल्याने  दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) याची चौकशी करावी अशी आपली मागणी आहे. फॉरेन्सिक चाचणी पथकाचा अहवाल येण्यापुर्वीच जर हा स्फोट गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचे पोलीस म्हणत असतील तर त्याची पोलखोल आपण करू, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार असल्याचे अधिकारी व इतरांनी दुर्लक्षित करू नये, कुणाचीही गय होणार नाही असे इशारे आमदार राणे यांनी दिले. या प्रकरणी आपण विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात गौप्यस्फोट करणार आहोत. त्यातून, आणि ही त्यादिवशीची ब्रेकिंग न्यूज असेल असा दावा आमदार राणे यांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla nitesh rane claim explosion during bomb testing not due to gas cylinder leak in akola zws

First published on: 08-11-2023 at 19:10 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×