सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. आज जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. दरम्यान दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,गजानन गावडे,महेश सारंग, बाबा परब, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, नीता राणे,व्हीकटर डाट्स, समीर सावंत, रवी मंडगावकर, सुशांत नाईक,आत्माराम ओटवणेकर, विध्याप्रसाद बांदेकर,मेघनाथ धुरी आदी संचालक या बैठकीस उपस्थित होते. या निवडीनंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे आणि प्रकाश मोर्ये यांचे अभिनंदन केले.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Devendra Fadnavis said We have to work with those who have struggled so far
“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले
devendra fadnavis
इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा

Nitesh Rane Bail: संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

नितेश राणेंची प्रतिक्रिया –

“जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून माझी आणि माझे सहकारी प्रकाश मोरे यांची निवड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केली आहे. कायद्यानुसार जो त्या चौकटीत बसतो त्याचं व्यक्तीला ती जबाबदारी देऊ शकतात. आम्ही आणि आमचे सहकारी त्या चौकटीत बसतो आमच्या खांद्यावर पक्षाने ही जबाबदारी दिली आहे,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

मुंबईतील बंगल्याला देण्यात आलेल्या नोटीशीवर बोलताना ते म्हणाले की, “नोटीस पाठवली आहे तर कायदेशीर गोष्टीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार. प्रसारमाध्यमांसमोर उत्तर देणं चौकटीत बसत नाही”.

“जे या सरकारविरोधात बोलत आहेत त्यांच्याविरोधात मैदानात लढायला घाबरत आहेत. मैदानात हारायचं आणि शेंबड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं याला काही अर्थ नाही. आम्ही त्यांना अंगावर येण्यापासून थांबवत नाही, पण आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

संजय राऊतांचा पत्रकार परिषदेत घाम पुसतानाचा व्हिडीओ ट्वीट केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “घाबरलेला माणूस कसा दिसतो आणि कितीही आव दाखवत असले तरी घाम पुसत असताना चेहऱ्याचे हावभाव महाराष्ट्राला दिसले पाहिजेत. शिवसेनेत असल्यानंतर प्रत्येकजण वाघ होत नाही. आजूबाजूला मांजरी पण असतात. जनतेला मांजर दिसावी म्हणून तो व्हिडीओ टाकला”.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या नितेश राणे यांना ९ फेब्रुवारीला कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच दर सोमवारी सकाळी १० ते १२ वाजता ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. याशिवाय पोलीस तपासात सहकार्य करतानाच पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा उपस्थित राहावे अशी अट जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातली आहे.

जामीन मिळाल्यानंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, इशारा देत म्हणाले, “त्या दिवशी अनेकांना ब्लड प्रेशरचा…”

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचला असल्याचा संशय आमदार नितेश राणे यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता.

काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण –

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.

“मतदारांवर दबाव आणण्यासाठी १८ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने नितेश राणेंचं नाव घेतलं होतं. पोलीस तपासात नितेश राणे दोषी आढळल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

संतोष परब यांचा आरोप काय होता –

“दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला,” असं संतोष परब यांनी सांगितलं होतं.