कर्जत : खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही भाजप नेत्यांची जुनी सवय. मात्र महाराष्ट्रातील जनता ही चलाखी खपून घेणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील भाजपचे नेते व केंद्र सरकार यांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर पवार सध्या प्रखरपणे टीका करताना दिसून येत आहेत. त्यांच्या ट्विटर हँडलवर रोज भाजपवर चुकीच्या गोष्टींवर हल्लाबोल केला जात असल्याचे दिसून येते. आजही त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खोटं बोलण्याच्या गोष्टीचा पर्दाफाश केला आहे.

फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल वरील करापोटी बारा रुपये देत असल्याचे सांगितले होते,मात्र फडणवीस हे कसे खोटे बोलत आहेत हे पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून  उघड केले आहे.

भाजपचे नेते खोटं बोलतात आणि तेही  रेटून बोलतात ही त्यांची जुनी सवय. पेट्रोलवर लावण्यात येणारे करातील साडेतीन पैसे केंद्राकडून राज्याला मिळत असताना बारा रुपये दिले जात असल्याचे हास्यास्पद विधान या ज्येष्ठ नेत्यांनी केले. मात्र ही चलाखी देशात कुठेही चालेल पण महाराष्ट्रात नाही व साडेतीन पैसे मिळत असताना यांना बारा रुपये कसे दिसले? बहुतेक अधिवेशनापासून यांना बाराचा आकडा दिसत आहे,अशी टीका  पवार यांनी  केली.

त्यांनी सांगितले, की पेट्रोलच्या करापोटी वीस रुपये आकारणी होते. यामध्ये कृषी, रस्ता यांचा कर लावला जातो. यामध्ये राज्य सरकारला एक रुपया देखील दिला जात नाही. ११ रुपये हा विशेष अबकारी कर लावला जातो. यामुळे राहिलेला एक रुपया आणि चाळीस पैसे हे प्रत्येक राज्य सरकारला दिले जातात. यामध्ये केंद्र सरकारने नवीन चाल खेळत अबकारी कर कमी करून उपकर वाढवला आहे, जेणेकरून हा सर्व कर केंद्र सरकारला जमा होतो. त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारला पेट्रोलवरील करात राज्यात ३२ रुपये ९० पैसे यापैकी अवघे साडेतीन पैसे देत आहे. यामुळे केंद्र सरकारचे अपयश लपविण्यासाठी भाजपचे राज्यातील नेते बारा रुपये देत असल्याची खोटी माहिती सांगत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp national congress party rohit pawar ncp akp
First published on: 11-07-2021 at 03:59 IST