scorecardresearch

“माझ्याकडे असलेली ‘ती’ पत्रं छापणार”, सामना अग्रलेखानंतर नितेश राणे यांचा शिवसेनला इशारा

नितेश राणे यांची शिवसेनेवर जोरदार टीका

सामना संपादकीयमधून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आज टीका करण्यात आली आहे. पूर्वी थोरातांची कमळा चित्रपट गाजला होता. आता विखे पाटलांची कमळा अशा एक चित्रपट आला आणि पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची टूक अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे. मात्र त्यांची टुरटूर सुरु आहे अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सामना संपादकीयमधून यांना टोला लगावण्यात आला आहे. यावेळी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इशारा देत टीका केली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत आपल्याकडील पत्रं प्रहारमधून छापण्याचा इशारा दिला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “सामनाच आमच्यावर प्रेम आहे…असणारच..का नाही असणार शेवटी ओल्ड इज गोल्ड. पण..काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायच पण नाही. काही “पत्रं” आहेत माझ्याकडे. तळकोकणच्या प्रहार मधुन लवकरच छापतो. मग बघु कशी कुरकुर होते”.

आणखी वाचा- ‘याआधी झालेल्या चुका सुधारण्याची हीच वेळ’, मनसेच्या राज्यपालांकडे महत्त्वाच्या मागण्या

नितेश राणे यांनी अजून एक ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत. पवारांना भेटले की फडणवीसांबद्दल उलट बोलायचं. राणेंना भेटले की ठाकरेंबद्दल उलट बोलायचं. ठाकरेंना राणेंबद्दल उलट बोलायचं. राज्यपाल भेटले की पवारांबद्दल उलट बोलायचं. असं करून स्वतःची किंमत संपवली! ना भावाला मंत्री,ना स्वतः संपादक!”.

आणखी वाचा- चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, ठाकरे सरकारची माहिती

भाजपाच्या गोधडीत शिरुन ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे आम्हाला आश्चर्य वाटते. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp nitesh rane on shivsena saamana editorial sanjay raut sgy

ताज्या बातम्या