“राऊतांच्या पक्षात आमदार आहेत त्यापेक्षा जास्त दलित खासदार म्हणून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेत”

“उत्तर प्रदेशात भाजपाला सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे ”

BJP, Ram Satpute, Shivsena, Sanjay Raut, UP Assembly Election
"उत्तर प्रदेशात भाजपाला सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे "

संजय राऊतांनी यांनी नेहमीप्रमाणे आपला तोंडपट्टा चालवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित बांधवाचे पाय धुतले याचा संदर्भ देत टीका केली. भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे अशी टीका भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे. संजय राऊतांनी दलितांच्या, शोषितांच्या प्रश्नावर भाजपाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही असंही ते म्हणाले आहेत.

“तुमच्या पक्षासारखं दिखावा आणि देखाव्यासारखं प्रेम नसतं म्हणूनच मोदींनी नुसता आदर दाखवण्यापुरता केला नाही तर समान संधी व प्रतिनिधित्वाचा हक्क भाजपाने खासदार म्हणून दिला आहे. राऊंताच्या पक्षात जेवढ्या आमदारांची संख्या आहे, त्यापेक्षा जास्त दलित बांधव खासदार म्हणून भाजपाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. म्हणूनच आमच्या जे पोटात आहे तेच ओठात आहे आणि तेच आमच्या कर्तृत्वात आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

“संजय राऊतांनी काँग्रेसला खुश करण्यासाठी आम्हाला ज्ञान पाजाळू नये. माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे की तुमच्या पक्षाने किती जणांना प्रतिनिधित्व दिले, हे जाहीर करावे,” असंही सातपुते महणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp ram satpue on shivsena sanjay raut up assembly election sgy

Next Story
“…नन्हे पटोले … लाईलाज फफोले!”; नाना पटोले प्रकरणात अमृता फडणवीसांचीही उडी, मोदींना दिली सूर्याची उपमा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी