भारतीय वायू दलासाठी आवश्यक असलेल्या एअरबसचे तंत्रज्ञान असलेल्या सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी अखेर बडोद्यात केली जाणार आहे. संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार यांनी याबाबतची घोषणा आज केली आहे. त्यामुळे फॉक्सकॉननंतर महाराष्ट्रात येणारा आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याचे समोर आले आहे. यावरून आता राज्यातील राजकारणत पुन्हा एकदा तापायला लागलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. तर महाविकास आघाडीच्या या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

हेही वाचा : आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातमध्ये; वायू दलाची सी-२९५ मालवाहू विमानं बनणार बडोद्यात

“सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे.” असं महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “मला जर विचाराल नोटेवर कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी सांगेन बाळासाहेबांचा, कारण…”; अनिल परबांचं विधान

याशिवाय “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यावर ८ सप्टेंबर २०२१ रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रीमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच २४ सप्टेंबर २०२१ रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे.” , असे आव्हानही केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.

हेही वाचा : ५० खोक्यांवरून होणाऱ्या टीकेबद्दल बच्चू कडूंनी केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या ३० ऑक्टोबरला होणार असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. एअरबस कंपनीची ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ आणि टाटाची ‘ टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड’हे संयुक्तरित्या बडोद्यात सी-२९५ या मालवाहू विमानांची निर्मिती करणार आहेत.