द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले. भाजपाच्या राजकारणावर बोलताना ए. राजा यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ए. राजा म्हणाले होते की, भारत हे एक राष्ट्र नाही, ही गोष्ट सर्वांनी नीट समजून घ्या. भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. हे एक राष्ट्र नसून उपखंड आहे. तसेच तमिळनाडू हे राज्य भाजपाच्या ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांभोवती फिरणाऱ्या विचारधारेचा कधीच स्वीकार करणार नाही. या विधानावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचा उबाठा गट इंडिया आघाडीसोबत आहे आणि इंडिया आघाडीमधील पक्षाचे नेते सातत्याने सनातन धर्माविरोधात बोलत असल्याबाबत बावनकुळे यांनी टीका केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून उद्घव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, “भारत हे एक राष्ट्र नाही, अशी भारतविरोधी भूमिका, ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांचा कधीच स्वीकार करणार नाही, ही राक्षसी महत्वाकांक्षा आणि राम किंवा रामायणावर विश्वास नाही.. असा माज करणारे द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांचे विधान म्हणजे राजाला लागलेले भिकेचे डोहाळे आहेत. हा कसला राजा हा तर भिकारी!! हा भारतीय सभ्यता, परंपरा व आस्थेचा अपमान आहे. वीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे दिवटे कर्नाटकचे मंत्री प्रियांक करतात.”

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Gajanan kirtikar on Narendra Modi
‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात
sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
Jayant Patil On Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बारामतीकर त्याच पद्धतीने…”

“भारत एक राष्ट्र नाही”, ए. राजांचं वक्तव्य; म्हणाले, “भाजपाच्या राम आणि भारतमातेला…”

“सनातन हिंदू धर्माचा अपमान इंडी आघाडीतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी करतात… आणि आत्ता ए. राजा यांनी हद्दच केली. राष्ट्रविरोधी विधान करून आमचे आराध्य प्राणप्रिय प्रभू श्रीराम, रामायण आणि महावीर हनुमंताचे अस्तित्व नाकारण्याचा नतद्रष्टपणा केला”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेजी, हेच आहेत ना तुमचे मित्र आणि नवे नेते.. सावरकरांचा अपमान तुम्ही मिंधे होऊन सहन केला. आता भारतमाता, प्रभू श्रीराम, रामायण आणि हनुमानाचा अपमान तुमचे निर्लज्ज सवंगडी करू लागले…यासाठीच तुम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली, बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे जनाब लिहू दिले. अरेरे, तुमच्याबद्दल आता कणव वाटू लागली आहे.”

प्रकाश आंबेडकरांची भूमिका संशयास्पद आहे का? संजय राऊत म्हणाले…

काय म्हणाले ए. राजा?

ए. राजा म्हणाले, या उपखंडात वेगवेगळ्या भाषा, परंपरा आणि संस्कृती आहेत. तुम्ही तमिळनाडूला आलात तर तिथली वेगळी संस्कृती तुम्हाला पाहायला मिळेल. केरळमधील संस्कृती वेगळी आहे. दिल्लीत वेगळी संस्कृती आहे. ओडिशात वेगळी संस्कृती आहे. काश्मीरमध्ये एक वेगळी संस्कृती आहे, तुम्ही त्या संस्कृतींचा स्वीकार करा. मणिपूरमधील लोक श्वानाचं (कुत्रा) मांस खातात. तुम्ही ती गोष्टदेखील स्वीकारली पाहिजे. एखादा समाज गोमांस खात असेल तर त्यात तुम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही. त्या लोकांनी तुम्हाला गोमांस खायला सांगितलं आहे का? त्यामुळेच विविधतेत एकता असूनही आपल्यामध्ये मतभेद आहेत. परंतु, तुम्ही ते मतभेद स्वीकारले पाहिजेत.